नागभीड : तालुका परिसरातील दर गुरुवारला नागभीड येथे आठवडी बाजार भरत असते. येथे परिसरातील शेतकरी तसेच भाजीपाला विक्रेते माल विकण्याकरिता येत असतात. यात भाजीपाला व्यवसायिकांचे प्रमाण अधिक असतो. मात्र बाहेर ठिकाणाहून आलेल्या विक्रेत्यांकडील काटापट्टी ही परताळणी केलेली नसल्याने ग्राहकांची मोठ्या लूट होत आहे.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दर २४ महिन्यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपली वजन व मापे यांची परताळणी करून घेणे गरजेचे आहे. असे असताना सुद्धा वर्षानुवर्षे काटा वजन माप परताळणी न करता व्यवसाय करीत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. या संदर्भात बाजारातील एखाद्या व्यवसायिक विक्रेत्याला विचारणा केली तर, हमरीतुमरीची भाषा वापरतात. यासंदर्भात वजन व मापे नियंत्रक वाळे यांची विचारणा केली असता, विक्रेते हुज्जत घालत असतात. कार्यवाही करण्यास मज्जाव करतात, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
नागभीड आठवडी बाजारात ग्राहकांची लूट
By admin | Published: September 26, 2016 1:06 AM