दलालांचा सुळसुळाट : रक्कम अदा करतेवेळी दोन टक्के रकम कपातगोंडपिंपरी : एकीकडे निसर्गाच्या कोपामुळे अन्नदाता उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. कसेबसे हाती आलेले पीक विकण्याकरीता गेले असता, दुसरीकडे मात्र दलाल व खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केल्या जात आहे. याचाच प्रत्यय तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर येत असून रकम अदा करते वेळी टक्के रकम कपात केली जात आहे.तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नापिकी व दुष्काळाचा सामना करीत आहेत. येथील शेतकरी भात, सोयाबिन व कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. अशातच तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्याने परगावी जावून कापसाची विक्री करावी लागते. या संदर्भात काही शेतकऱ्यांची विचारणा केली असता, कापूस खरेदी केंद्रावर जावून कापसाची विक्री केली. तेव्हा खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या कापसाच्या अदा रक्कमेतून १ टक्का दलाली व १ टक्का रक्कम कंपनीकडून, असे दोन टक्के रक्कम कपात केली जात असल्याची माहिती दिली.दिवसेंदिवस अहोरात्र मेहनत घेत शेतात घाम गाळून रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्ग संकट, कर्जबाजारीपणा व परिवाराच्या उपजिवीकेची अशा विविध समस्यांना तोंड देत शेती व्यवसाय करावा लागतो. यातून कसेबसे सावरत हाती आलेले पीक विक्री करण्यास गेले तर दलाल व खरेदीदारांकडून आर्थिक लुट केल्या जाते. एकीकडे निसर्गाचा कोप असा अन्याय होत चालला आहे. आता कापूस खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट
By admin | Published: February 22, 2016 1:16 AM