तोहोगाव : वन्यप्राण्यांच्या व कोरोनाच्या दहशतीत मजूर आपला जीव मुठीत घेऊन तेंदुपत्ता संकलन करून फडीवर नेऊन विक्री करीत आहेत, परंतु तोहोगाव येथील फडी मुन्शी त्या मजुरांची लूट करीत आहे. त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे.
तेंदू पुडे लावणे, पलटविणे ही कामेही त्याच मजुरांकडून करवून घेत आहेत व जास्तीचे मजूर दाखवून ठेकेदाराकडून पैसे वसूल करून स्वतः हडप करीत असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. दर शंभर पुड्यांमागे चार व सहा पुडे येथील मुन्शी जादा घेतात, असाही आरोप मजुरांनी केला आहे.