लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची चौकशी करुन वीज वितरण कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भद्रावती तालुक्यातील वडेगाव येथील माधव जिवतोडे यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षाकडे तक्रारीद्वारे केली आहे.मार्च २०१८ अखेरपर्यंत राज्यात कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरुन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या दोन लाख ४९ हजार ३५८ शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने अद्याप वीज जोडणी दिली नाही. शेतकऱ्यांनी शेतात विहिर, हातपंप, नाले व शेत तलावावर कृषी पंप बसविले. शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी रक्कमही भरली. परंतु महावितरणकडून मुदतीत वीज पुरवठा देण्यात आला नाही. वीज अधिनियम २००३ अन्वये शेतकऱ्यांनी वीज पुरवठा मिळविण्यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज केल्यावर कलम ४३ (१) नुसार एक महिन्याचे आत वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. पण महावितरणने वीज कायद्याचे उल्लंघन केले. वीज अधिनियम २००३ मधील कलम ५६ (१) अन्वये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करून ग्राहकांचे संरक्षण करण्यास महावितरण कंपनी अपयशी ठरल्याने कलम ५६ (२) नुसार बाधीत शेतकरी नुकसान भरपाईकरिता पात्र आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वीज जोडणी प्रलंबीत ठेवल्याने कायद्यातील ४३ (३) नुसार प्रती दिवसासाठी एक हजार रुपयाप्रमाणे राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना तब्बल ९१ अब्ज १ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागेल, असा दावा माधव जिवतोडे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे तक्रारीद्वारे केला आहे.
कृषी पंप वीज जोडणीअभावी अडीच लाख शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 2:07 PM
राज्यातील २ लाख ४९ हजार ३४८ शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी मुदतीत न जोडून दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
ठळक मुद्देवीज नियामक आयोगाकडे तक्रार महावितरणकडूनच कायद्याचे उल्लंघन