लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : रानटी डुकरांनी घातलेल्या हैदोसामुळे वामन गिरमारी चौधरी नामक शेतकºयाच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.अहेरी राज्य मार्गालगतच वनसीमेजवळ त्यांचे शेत आहे. मागील वर्षाच्या नापिकीनंतर यंदा कापूस पिकाची लागवड केली असता त्या पिकांचीही रानडुकरे नासाडी करीत आहेत. सदर शेतकºयाने रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडे धाव घेतली आहे.येथील शेतकरी वामन गिरमाची चौधरी यांचे सर्व्हे नं. ३२८ मध्ये २.५१ हेक्टर आर. शेत आहे. या शेताला लागूनच वनहद्द आहे. वामन चौधरी यांनी मागील वर्षीच्या सोयाबिन उत्पादनात झालेल्या नापिकीमुळे यंदा कपाशीची लागवड केली. यावर्षी अत्यल्प पाऊस पडूनही कापसाची उत्तम प्रकारे लागवड केल्याने आज पिकांमधील वृद्धी व कपाशीला बोंड लागले आहेत. ऐन उत्पादन हाती येताना शेजारच्या जंगलातील रानटी डुकरांनी पिकात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कपाशींची पडझड झाली आहे. रोजच्या रानडुकराच्या हैदोसात त्यांच्या शेतात सर्वत्र पºहाटी मुळासकट उपटून काढल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत वामन चौधरी यांनी वनविभागाकडे या संदर्भात तक्रार नोंदविलेली आहे.
रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:01 PM
रानटी डुकरांनी घातलेल्या हैदोसामुळे वामन गिरमारी चौधरी नामक शेतकºयाच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
ठळक मुद्देबंदोबस्तासाठी वनविभागाकडे धाव