उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील मालपिरंजी येथील क्रीश नामक १२ वर्षीय बालक २९ जूनपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते़ दरम्यान सावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बल्लारपुरातील रेल्वेस्थानकावर क्रिशला ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांच्या चेहºयावर आनंद फु लले़ ही घटना मंगळवारी घडली़क्रिश हा चुलत बल्लारपुरातील मामाकडे असल्याची माहिती मिळाल्याने आईवडिल निश्चित झाले. मात्र दोन दिवसानंतरही तो घरी परत न आला नाही़ कुटुंबीयांची धाकधुक वाढली. नातेवाईकांकडे शोधून न सापडल्याने मुलगा हरविल्याची तक्रार सावली ठाण्यात ६ जुलैला दाखल केली़ ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख यांच्या नेतृत्वात शिपाई अविनाश बांबोये, मनीषा गडमडे, व चालक नारायण सिडाम यांना घेवून तपास मोहीम सुरु करण्यात आली. रेल्वे पोलिसांनीही रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदार, चहाटपरी व पानठेला चालकांना क्रिशची माहिती देण्यात आली़ शोधाशोध करून दोन आठवडे उलटले़ पण क्रिशचा पत्ता लागत नव्हता. सावली पोलिसांचे पथक दक्षिणेकडील शहरात जाण्याच्या तयारीत होते. मंगळवारी बल्लारपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांना क्रिश आढळला़ सावली पोलिसांनी क्रिशला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो सिकंदराबाद येथील रेल्वेस्थानकाच्या शेजारील चहाटपरी चालकाकडे काम करु लागला होता. चहाटपरी चालकाने त्याला बल्लारपूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसवून दिल्याचे समजते.
हरवलेला क्रिश घरी सुखरुप परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:43 PM
तालुक्यातील मालपिरंजी येथील क्रीश नामक १२ वर्षीय बालक २९ जूनपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते़ दरम्यान सावली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बल्लारपुरातील रेल्वेस्थानकावर क्रिशला ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फु लले़ ही घटना मंगळवारी घडली़
ठळक मुद्देपोलिसांची कामगिरी : मालपिरंजी येथील जराते कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य