सव्वा लाखांचे नुकसान : मळणीदरम्यान लागली आगनेरी : नेरी येथून जवळच असलेल्या गोंदेडा येथील शेतकरी बालू डांभे याच्या धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागल्याने या आगीत पुंजने जळून खाक झाले. यामध्ये ६० पोते धान होण्याचा अंदाज होता. त्यामुळे त्यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे.१० नोव्हेंबरला बालु डांगे यांच्या शेतामध्ये धान मळणीसाठी केवाडा येथील मळणी यंत्र लावली होती. धान मळणीला सुरूवात झाली. परंतु मशिनमध्ये नैसर्गिक बिघाड झाल्याने मशिन बंद पडली आणि अचानक पुंजने जळायला सुरूवात झाली. अचानक लागलेली आग विझविण्यासाठी उपस्थितांनी प्रयत्न केले. मात्र जवळपास पाण्याची सोय नसल्यामुळे अगदी काही क्षणामध्ये संपुर्ण धानाचा पुंजना जळुन खाक झाला. यामध्ये अंदाजे १ लाख २० हजार रुपयाचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
गोंदेडा येथे धानाचे पुंजने जळाले
By admin | Published: November 12, 2016 12:49 AM