लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे. सोमवारी विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ सावली येथे संमिश्र बंद पाळण्यात आला. इतर ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.भारत बंदच्या हाकेला ओ देत सावली येथील बौद्ध समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. याला सावलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती तर काहींनी सुरू. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.चंद्रपुरात बंदचा कुठेही असर दिसून आला नाही. मात्र गोंडवाना गणतंत्र पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू झोडे, मनोज आत्राम, नामदेव शेडमाके, संजय वानखेडे, डॉ. संदीप शेंडे, रमेश मेश्राम, महेंद्र झाडे, प्रशात गावंडे, सुरज रामटेके, बलदेव धुर्वे, गजानन कोहळे, सांरग कुमरे, मोनल भडके आदी उपस्थित होते.भद्रावती तालुक्यातील माजरी येथील डॉ. आंबेडकर चौकात राष्टÑीय महादलित परिसंघ, कॉग्रेस पार्टी, भारिप बहुजन महासंघ, एससी, एसटी कौन्सिल, बहुजन समाज पार्टी व दलित आदिवासी समाज एकत्र आले. त्यानंतर सर्वांनी माजरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार कृष्णा तिवारी, भद्रावतीचे नायब तहसीलदार काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी भारिपचे उल्लास रत्नपारखी, रमेश तायवाडे, गोलू गुलगुंडे, काँग्रेसचे गोल्ला कोमारैया, रवी कुडुदुला, सतीश कुदुडुला, भोगे मल्लेश, राष्ट्रीय महादलित परिसंघाचे महराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश रेवते, एससी, एसटी कौन्सिलचे किशोरीकांत चौधरी, बहुजन समाज पार्टी राजेंद्र प्रसाद आदी उपस्थित होते.चिमूर येथील त्रिशरण महिला मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेविका कल्पना इंदूरकर, किरण भैसारे, वनिता सहारे, रजनी मेश्राम, सिंधु अंबादे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:49 PM
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे. सोमवारी विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्दे‘तो’ निर्णय रद्द करा : ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन