लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तद्वतच पेपरमीलकडून पाणी घ्यावे लागत होते. परंतु लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन फुटाहून अधिक वाढली आहे.या उपाययोनेमुळे जीवन प्राधिकरणाच्या विहिरीला मुबलक पाणी पुरवठा होऊ लागल्याने शहरात पेयजलाची उद्भवलेली समस्या तुर्तास दूर झाली आहे. आता नळाद्वारे दररोज पाणी मिळणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने या उन्हाळ्यात वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही.त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. ही स्थिती बिकट होण्याची शक्यता दिसत असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी केली. आर्वीतील लोअर वर्धा धरणाचे ३२ एम.एम. क्युब मीटर पाणी वर्धा नदीत २०-२५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. ते पाणी तब्बल २२ दिवसांनी म्हणजे रविवारला दुपारला येथे येवून पोहचले आहे. त्यामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन अडीच फुटाने वाढली आहे. त्यामुळे येणाºया मान्सूनपर्यंत येथील पाणी पुरवठा पूर्वीप्र्रमाणे दररोज सुरू राहील, अशी माहिती मप्रजाचे विभागीय अभियंता यांनी दिली. मान्सून नियोजित वेळेवर न येता काहीसा लांबला तरी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे.लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने येथील पाणी पुरवठा जरी दररोज केला जाणार असला तरी नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.- सुशील पाटील,विभागीय अभियंता, बल्लारपूर.
लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:09 PM
यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : बल्लारपूरची पाणी समस्या तात्पूरर्ती दूर