वहानगाव येथे प्रियंका एलपीजी गॅस चिमूरच्या वतीने घरगुती गॅस वापरण्यासंबंधी कार्यशाळेत संचालक मनीष तुम्पल्लीवार, सरपंच प्रशांत कोल्हे उपस्थित होते. गॅस ही स्फोटक व जलद गतीने पेटणारा ज्वलनशील वस्तू आहे. सिलिंडर नेहमी सरळ दिशेने ठेवावयास पाहिजे. गॅस संपला, तरी सिलिंडर आडवा करू नये. एका सिलिंडरमधून दोन कनेक्शन लावू नये. रबर ट्युबला तारेचे कव्हर लावू नये. तारेचे कव्हर लावल्याने, छिद्र पडल्यास जीवघेणा धोका होऊ शकतो. स्वयंपाक करीत असताना शेगडीजवळ उपस्थित राहावे आणि काम नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवावे. दर पाच वर्षांनी गॅस पाइप बदलवून घ्यावा व कंपनीच्या परवाना प्राप्त एजन्सीच्या व्यक्तीकडून तपासणी करून घ्यावी, असे मनिष तुम्पल्लीवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव असल्याने, प्रियंका एलपीजी गॅस चिमूरच्या वतीने महिलांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.