शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

‘महाराष्ट्र बनणार मंच’चे शनिवारी आयोजन

By admin | Published: May 04, 2017 12:41 AM

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे.

चंद्रपूर : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे. कलाकारांंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार विजेता, तेही तुमच्या नजरेसमोर. हा कार्यक्रम ६ मे शनिवारला सायंकाळी ४ वाजता रसराज रेस्टॉरंट जटपूरा गेट चंद्रपूर येथे आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल. हाच कार्यक्रम महाराष्ट्रात कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित आता महाराष्ट्र बनणार मंच, ज्यात सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिमनॅस्टिक, आॅक्रेस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारूड, खंजिरी वादन, ढोल पथक इत्यादी व यासारखे कलाप्रकार सादर करता येईल. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे. कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नाविन्यपूर्ण शो चे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे.एका टॅलेंट शो ला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मे पासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या अंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत कलाकार सामील होऊ शकतील. आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर रंगणार आहे.नोंदणी करण्याचे आवाहनचंद्रपूर शहरात ६ मे शनिवारला ‘महाराष्ट्र बनणार मंच’ हा कार्यक्रम होत आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता ५ मे पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. वेळेवर नोंदणी स्वीकारण्यात येणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कार्यक्रमस्थळी मेकअपची व्यवस्था नसून घरूनच तयार होऊन यावे लागेल. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी (९०११३२२६७४), (९२७०१३१५८०) या क्रमांकावर संपर्क करा. ही स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे.