लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासाठी ५०० कोटींचे विकासाचे विशेष पॅकेज देण्यात येईल, अशी घोषणा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.नागरिकांना आवाहन करणाऱ्या या पत्रकात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात चंद्रपूर शहरात आ. नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात विकासाची अभूतपूर्व अशी कामे करण्यात आली आहे. नानांच्या सक्रीय योगदानाशिवाय ही विकासकामे कधीही पूर्ण होवू शकली नसती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, वनअकादमी, बाबा आमटे अभ्यासिका, एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, नियोजन भवन, कोषागार कार्यालय, विक्रीकर कार्यालय, आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले चंद्रपूर रेल्वे स्टेशन, दीक्षाभूमी परिसराचा विकास, प्रियदर्शिनी नाटयगृहाचे नुतनीकरण, प्रगतीपथावर असलेले बसस्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम, शहरानजिक देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारणारे कॅन्सर हॉस्पिटल अशी विकासकामांची दिर्घमालिका आम्ही या शहरात तयार केली.चंद्रपूर शहराच्या तसेच या विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा रथ वेगाने धावत आहे. वेगाने धावणाऱ्या या विकासरथाला केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची मोलाची साथ लाभत आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ होणार आहेच. जर चंद्रपुरात आपण भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर हा मतदार संघ, हे शहर २५ वर्षे मागे जाईल. म्हणून मतदान विकासावरच करत या मतदार संघाच्?या, शहराच्या विकासासाठी नाना श्यामकुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा नाना श्यामकुळे विजयी झाल्यास शहरात विकासाचा झंझावात निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रामुख्याने लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क, कौशल्य विकास विद्यापीठ अर्थात स्कील युनिवर्सिटी, डिजीटल शाळांची निर्मिती, महिला बचतगटांच्या माध्यमातून उत्पादित वस्तुंच्या विक्रीसाठी मॉलचे बांधकाम, महाकाली मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, विठ्ठल मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, ज्युबिली हायस्कुल परिसरात वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमचे बांधकाम, पोलीस ग्राऊंडचे अत्याधुनिकीकरण, सिंथेटीक ट्रॅकची निर्मिती, पाच नव्या अभ्यासिकांची निर्मिती, पंतप्रधान आवास योजना व घरकुलाशी संबंधित अन्य योजनांच्या माध्यमातुन प्रत्येक बेघराला हक्काचे घर, आझाद बगीच्याचे सौंदर्यीकरण यासारखी अनेक कामे तातडीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नाना श्यामकुळे यांच्यासोबत मी आहे. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्ती आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शक्ती आहे. मोदींच्या पाठिशी देशातील जनतेची शक्ती आहे. विकासाची ही श्रृंखला तुटता कामा नये, यासाठी भाजप उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Maharashtra Election 2019 ; चंद्रपूरसाठी ५०० कोटींचे विकासाचे विशेष पॅकेज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM
राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ होणार आहेच. जर चंद्रपुरात आपण भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर हा मतदार संघ, हे शहर २५ वर्षे मागे जाईल. म्हणून मतदान विकासावरच करत या मतदार संघाच्?या, शहराच्या विकासासाठी नाना श्यामकुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नाना श्यामकुळेंच्या पाठीशी मी सदैव