मूल : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी आपले नामांकन मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन दाखल केले. यावेळी मूल येथून महारॅली काढण्यात आली. बल्लारपूर मतदार संघातील अनेक गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने मूल येथे येऊन या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मूल शहर गजबजून गेले होते.या महारॅलीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, रिपाइंचे सिद्धार्थ पथाडे, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या रॅलीदरम्यान एका उघड्या जिप्सीत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नाना श्यामकुळे, देवराव भोंगळे उभे राहून नागरिकांना अभिवादन करीत होते. फेटेधारी महिलाही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडून मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.काही महिला शंखनाद करीत होत्या. यावेळी रॅलीत सहभागी नागरिकांनीही सर्वधर्मियांची वेशभुषा साकारली होती. या सर्व गोष्टीमुळे मूल शहरात एखादी जत्राच असावी, असा भास होत होता. नामांकन दाखल करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकालीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी नागरिकांना संबोधित करताना भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपण मागील पाच वर्ष जिल्ह्यात सातत्याने विकासकामे केली. अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविले. राज्य व केंद्र सरकारचे लोकहितकारी निर्णयाची जिल्ह्यात तत्काळ अंमलबजावण्२ाी केली. या कामांच्या बळावरच ही निवडणूक प्रचंड मताधिक्यासह जिंकू, असाही विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ‘निवडून देऊ सुधीरभाऊंना हा अमुचा निर्धार, या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीरभाऊ मुनगंटीवार’ हे गितही वाजविले जात होते. कार्यकर्त्यांनी दिलेल्या विजयी घोषणांनी संपूर्ण मूल शहर निनादून गेले होते.
Maharashtra Election 2019 ; नामांकनासाठी दिग्गजांचे शक्ती प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM
मूल : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी आपले नामांकन मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन ...
ठळक मुद्देआता प्रचाराची रणधुमाळी होणार सुरू : विधानसभा मुख्यालयात निघालेल्या रॅलींनी दणाणली शहरे