शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Maharashtra Election 2019 : वडेट्टीवारांच्या विरोधात आयात उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:01 AM

भाजपच्या तिकिटासाठी मुंबईच्या वाऱ्यांमध्ये गुंतून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी भाजप नेत्यांचे उंबरठे झिजविणे सोडून मातोश्रीचे द्वार ठोठावले.

- राजेश भोजेकरब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार निवडणूक लढणार हे निश्चित होते. यामुळे सत्ताधारी भाजप हे तगडे आव्हान कसे पेलते, या अनुषंगाने राज्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागून होते. अखेरच्या क्षणी भाजपने महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडल्याने या मतदार संघाची चुरसच संपल्यागत स्थिती निर्माण झाली. भाजपकडे दोनदा आमदार राहिलेले प्रा. अतुल देशकर यांच्यासारखा स्वच्छ चेहरा होता. मात्र भाजपने त्यांच्यावर विश्वास न दाखविता अन्य जागेच्या मोबदल्यात ही जागा शिवसेनेच्या पदरात टाकली. या मतदार संघात शिवसेनेकडे नेतृत्वच नसल्यामुळे कार्यकर्ते दूरची गोष्ट. ही आयती संधी साधून भाजपच्या तिकिटासाठी मुंबईच्या वाऱ्यांमध्ये गुंतून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी भाजप नेत्यांचे उंबरठे झिजविणे सोडून मातोश्रीचे द्वार ठोठावले. शिवसेनेकडेही चेहरा नसल्यामुळे गड्डमवारांना विना प्रयासाने ही तिकीट मिळाली. सत्ताधारी पक्षाकडून तिकिट मिळाल्याने गड्डमवार कामाला लागले आहेत. मात्र, वडेट्टीवारांचे आव्हान ते कसे पेलते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जमेच्या बाजूब्रह्मपुरीतून पहिल्यांदाच आमदार होते. विरोधी पक्षात असताना अनेक विकासकामांसाठी निधी खेचून आणला. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई व्हाव्यात म्हणून अनेकदा निकरीचा लढा दिला. गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा तलावात आणले. ब्रह्मपुरी नगर परिषद, सिंदेवाही व सावली नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकविला. अनेक ग्रामपंचायतीही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. लोकसभेत खासदारही पाठविला. जनतेशी दांडगा संपर्क.उणे बाजूगेल्या निवडणुकीत काही महत्त्वपूर्ण आश्वासने विजय वडेट्टीवार यांनी या मतदार संघातील जनतेला दिलेली होती. परंतु राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाही. सावलीचा पाच वर्षांत चेहरामोहरा बदलविणार, साखर कारखाना उभारणार, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी सावली व सिंदेवाहीत एमआयडीसीची मुहूर्तमेढ रोवणार ही आश्वासने अपूर्ण राहिली.

टॅग्स :bramhapuri-acब्रह्मपुरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार