शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM

चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दुर्गापूर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. या विधानसभा क्षेत्राचाच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा विकास करण्याचा गेल्या पाच वर्षात मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर सर केले. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असावे, यासाठी मिशन सेवाच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिकांची निर्मिती केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली पुन्हा एकदा साथ हवी आहे, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, दुर्गापूर परिसरात सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या माध्यमातृन उत्तम सोय उपलब्ध झाली आहे. ऊर्जानगर येथे आठ कोटी ७८ लक्ष रू. किमतीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाली आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरो मशीनद्वारे शुध्द पेयजल पुरवठा आपण करीत आहोत. दुगार्पूर येथे स्मार्ट पोलीस स्टेशनची निर्मिती आपण केली आहे.हा मतदार संघ शंभर टक्के आरोयुक्त, एलपीजी गॅसयुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. मतदार संघातील अंगणवाडया पूर्णपणे आयएसओ मानांकित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विकासाचे हे पर्व नागरिकांच्या मदतीने आपण पुढे नेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या सभेला परिसरातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभेपूर्वी दुगार्पूर परिसरात रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी समतानगर, नेरी, कोंडी या परिसरात बैठकींना सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. सिनाळा, वरवट, चोरगांव या गावांमध्ये भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशयावेळी कॉंग्रेसचे रमेश पुलिपाका, सतिश मासीरकर, समीर शेख यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा दुप्पटा घालून त्यांचे स्वागत केले व पक्षप्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार