शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Maharashtra Election 2019 ; विजयाची हॅटट्रीक : पाच वर्षातील पायाभूत विकासकामे जनतेला भावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:43 AM

सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासकामांची मालिकाच सुरू केली. दूरदृष्टी ठेवत बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध लघु उद्योगांना चालना दिली. कोट्यवधींचा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डायमंड कटींग प्रशिक्षण सेंटर, सैनिकी स्कूल, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ठिकठिकाणी इको पार्क यासारखी शहराचा चेहरामोहरा बदलविणारी कामे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विद्यमान अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार म्हणून रिंगणात होते. ते विजयी होतील, असे चित्र प्रचारादरम्यानच स्पष्ट होते. झालेही तसेच. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांचा ३२ हजार ८५८ मतांनी पराभव केला.सुधीर मुनगंटीवार यांना ८५, २०४ मते मिळाली तर डॉ. विश्वास झाडे यांना ५२,३४६ मते पडली. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे ३९,३८२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासकामांची मालिकाच सुरू केली. दूरदृष्टी ठेवत बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध लघु उद्योगांना चालना दिली. कोट्यवधींचा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डायमंड कटींग प्रशिक्षण सेंटर, सैनिकी स्कूल, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ठिकठिकाणी इको पार्क यासारखी शहराचा चेहरामोहरा बदलविणारी कामे केली. याशिवाय सिंचन, उद्योग, पाणी पुरवठा यासाठीही भरपूर निधी दिला. त्यांच्या या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय होते. काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे हे मतदारांसाठी नवखे होते. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांवरच त्यांना समाधान मानावे लागले. वंचितचे राजू झोडे हेदेखील मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकले नाही. अखेरच्या फेरीनंतर मुनगंटीवार यांना ३२ हजार ८५८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.85,204मिळाली मतेविजयाची तीन कारणे...1दूरदृष्टी असलेला नेता. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विकासकामात स्वत:ला झोकून दिले. चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले. लहान-लहान उद्योगांतून महिलांना आत्मनिर्भर बनविले. बचतगटाची चळवळ निर्माण केली.2मतदार संघात दांडगा जनसंपर्क. कुणाच्याही हाके ओ देऊन त्याच्या समस्यांचे निराकरण करणे.3भाजपची पारंपारिक मते कायम जुळवून ठेवली. कार्यकर्त्यांशी आपुलकीची वागणूक.

टॅग्स :ballarpur-acबल्लारपूर