लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सहाही विधानसभा मतदार संघातून तब्बल १९ जणांनी माघार घेतल्यामुळे आता ७१ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. पक्षांसह अपक्षांना बोध चिन्हांचे वाटप झाल्यामुळे दसºयाच्या शूभमुहूर्तावर प्रचाराचा शंखनाद होणार हे नक्की. यानंतर सुमारे १० दिवस प्रचारतोफा गरजणार आहे. यामध्ये मतदार राजाला कोण आपल्याकडे आकर्षित करतो, हे बघण्यासारखे आहे.बल्लारपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य व नितीन भटारकर तसेच अपक्ष संजय गावंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची चुरस बघायला मिळणार आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे व वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे प्रमुख उमेदवार आमने-सामने आहेत.चंद्रपूर मतदार संघातून ज्योती रंगारी, प्रियदर्शन इंगळे, सुधाकर कातकर व हरिदास लांडे या ४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १२ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यामध्ये भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसचे महेश मेंढे व अपक्ष किशोर जोरगेवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत.चिमूर मतदार संघातून रमेश गजबे, गजेंद्र चाचरकर, अमृत नखाते व किशोर घानमोडे या चार उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्यामुळे १३ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार कीतीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतीश वारजुकर व वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर हे प्रमुख उमेदवार आमने-सामने आहेत.ब्रह्मपुरी मतदार संघातून दिलीप शिवरकर, वसंत वारजुकर व धानु वलथरे या ३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देणार आहेत.वरोरा विधानसभा मतदार संघातून अंकुश आगलावे या एकमेव उमेदवाराने माघार घेतली असून निवडणूक रिंगणात १३ उमेदवार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, मनसेचे उमेदवार रमेश राजुरकर व शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे यांचा समावेश आहेत.राजुरा मतदार संघातून भारत आत्राम, रामराव चव्हाण, तुकाराम पवार व पंकज पवार या ४ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाजपचे अॅड. संजय धोटे, काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे व स्वभापचे अॅड. वामनराव चटप या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत. सोमवारी निवडणूक चिन्ह वाटप झाल्याने आता सहाही मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Maharashtra Election 2019 : १९ जणांची माघार; ७१ उमेदवार रणांगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:16 AM
३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देणार आहेत.
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर होणार प्रचाराचा शंखनाद