ठळक मुद्देभावी वर-वधू मतदानाच्या रांगेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांना राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे. त्यामुळे मुंडावळ््या बांधून झाल्यावर त्यांची वरात देवळात न जाता आधी मतदान केंद्रावर आली आहे. येथे मतदान करून ते पुढील कर्तव्यासाठी निघणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची वाग्दत्त वधूही गिरगाव येथे मतदानासाठी रांगेत उभी असल्याचे वृत्त आहे.