लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हे आकडे पाहून महाराष्ट्र शेतकरी ‘सुसाईड हब’ झाले काय, असा थेट सवाल करून यावरून येत्या अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी दिला.धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची शासकीय मदत दिली जाते. परंतु या १४ हजाह ६७० शेतकऱ्यांपैकी केवळ ९० टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या मदतीपासून वेगवेगळे निकष लावून डावलल्याचा आरोपही यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी केला.जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पावर पाच वर्षांत सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता हवेत विरली आहे. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र टँकर लावायची गरज पडली आहे. ११ हजार टँकरची महाराष्ट्रात गरज निर्माण झाली आहे. मग जलयुक्त शिवारवर खर्च झालेले पैसे कुठे गेले. याचे आॅडिट करणार काय, असा सवाल करून जलयुक्त शिवार म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण होती, असा गंभीर आरोपही यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केला.राज्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर शासनाकडून काहीही उपाययोजना नाही. शेतमालाला भाव मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप भाव मिळाला नाही. शेतकरी सन्मान योजनेचा लाभही अनेक शेतकऱ्यांना एकच सातबारा असल्यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांना आता सावध राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त म्हणून माफी मागून सामाजिक औदार्य दाखवावे, या शब्दात आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारच्या धोरणावर सडकून टिकास्त्र सोडले. यावेळी विनोद दत्तात्रेय, सचिन कत्याल, राजेश अड्डूर उपस्थित होते.महात्मा गांधींचा अवमानप्रकरणी निधीचौधरींना निलंबित कराजगाने गांधीजींचे विचार व आचार स्वीकारला आहे. महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी करीत असताना टिष्ट्वट करून महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या मुंबई महानगर पालिका आणि आताच्या पाणी पुरवठा विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांचा निषेध नोंदवत त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी विधान सभेतील काँग्रेसचे उपनेता आ. वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्र आता शेतकरी ‘सुसाईड हब’ झाला काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:00 AM
राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवारांचा सवाल : पाच वर्षांत १४ हजार ६७० आत्महत्या