मूल : महात्मा फुले यांनी मानवजातीसाठी केलेल्या कार्याला जगात तोड नसून महात्मा फुले यांचे साहित्य वाचून स्वविकासासोबतच समाजाचा विकास घडवावा, असे मत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी व्यक्त केले.
ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मूल येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. के. एच. कऱ्हाडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भय्याजी ढोंगे, गंगाधर कुनघाडकर, रामभाऊ चौधरी, युवराज चावरे, प्रा. गुलाब मोरे, प्रा. प्रभाकर धोटे, नामदेव गावतुरे, श्रावण लोनबले, सुरेश टिकले, दलित जनबंधू, किरण खोब्रागडे आदी उपस्थित होते.