दंड वसूल : १० लाखांची चोरी उघडकीस चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत सर्व विभागात १ एप्रिल पासून वीज चोरांविरोधात धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे. या धडक मोहिमेच्या माध्यमातून वरोरा, ब्रम्हपुरी, आलापल्ली व चंद्रपूर विभागात ५८ वीज चोरट्यांना पकडून त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या २४ दिवसात ही कारवाई करण्यात आली असून या मोहिमेतून १० लाखांची वीज चोरी उघडकीस आली आहे.वरोरा विभागात पकडेलेल्या ५ वीजचोरीच्या घटनांत मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकूण मीटर थांबविणे, मीटरमध्ये रिमोट किट बसवून रिमोटने वीजचोरी करने तसेच मीटर बायपास करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या वीजचोरांनी १२ हजार १५७ युनिटची वीजचोरी करत १ लाख ४९ हजार ७७५ रूपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आलापल्ली विभागाने १ लाख ३५ हजाराच्या ९ वीजचोऱ्या पकडल्या आहेत. तर चंद्रपूर विभागाने राबविलेल्या धडक वीज मिटर तपासणी मोहिमे अंतर्गत मिटर सोबत छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या ४ ग्राहकांना दणका बसला आहे. त्यांनी ७ हजार ४९० युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ लाख २८ हजार रूपये वसूल करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ब्रह्मपुरीत सर्वाधिक चोरीवीज चोरीची सर्वाधिक ४० प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून यात वीज मिटर सोबत छेडछाड करून १० ग्राहकांनी तर आकोडे टाकून २३ जणांनी वीजचोरी केल्याचे आढळले. सात ग्राहक सर्व्हिस वायर टॅप करून परस्पर वीजचोरी करतााना सापडले आहेत. या सर्व ४० वीजचोरांनी ५ लाख ८८ हजार ९३० रूपयांची तसेच १ लाख २ हजार ६०९ युनीट्ची वीज चोरी केल्याचे समोर आले. या सर्व वीज चोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करून वीजचोरीचे ५ लाख ५८ हजार रूपये वसुल केले आहे.
५८ वीज चोरट्यांना महावितरणचा दणका
By admin | Published: April 26, 2017 12:39 AM