सभापतिपदाचे आरक्षण घोषित : बल्लारपूर, गोंडपिपरी व राजुरा पंचायत समिती सर्वसाधारण राखीवचंद्रपूर : आगामी पंचायत समितीच्या सार्वत्रीक निवडणुकीनंतर सभापती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी सभापती पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये १५ पंचायत समित्यात अनुसूचित जाती प्रवर्ग २, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ व सर्वसाधारण वर्गासाठी ६ असे आरक्षण निघाले आहे. बल्लारपूर, राजुरा व गोंडपिपरी येथे सर्वसाधारण सभापती पदाचे आरक्षण असून जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अर्जून चिखले यांच्या प्रमुख उपस्थित सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात जिल्ह्यातील मूल (अनुसूचित जाती), चिमूर व जिवती (अनुसूचित जमाती), चंद्रपूर व ब्रम्हपुरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) तर सावली, पोंभुर्णा व वरोरा (सर्वसाधारण) या आठ पंचायत समितीवर महिलांना सभापती पदाची संधी आरक्षण सोडतीच्या माध्यमातून मिळणार आहे. भद्रावती (अनुसूचित जाती), सिंदेवाही (अनुसूचित जमाती), नागभीड व कोरपना (नागरिकांचा मागास प्रवर्ग) तर बल्लारपूर राजुरा व गोंडपिपरी या सात पंचायत समितीवर जाती निहाय सर्वसाधारण आरक्षण घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर आगामी सार्वत्रीक निवडणुकीनंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सदर आारक्षण लागू राहणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांना सभापती पदावर उमेदवारांना बसविण्यासाठी राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यानुसारच उमेदवार ठरविले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: बल्लारपूर, राजुरा व गोंडपिपरी येथील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने येथील पंचायत समितीच्या निवडणुकीत रणधुमाळी गाजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महिला आरक्षणाने अनेकांचे स्वप्न भंगलेजिल्ह्यातील मूल व चिमूर पंचायत समितीवर सध्या महिला सभापती पद भूषवित आहेत. आजच्या आरक्षण सोडतीत पुन्हा एकदा मूल पंचायत समितीवर अनुसूचित जाती महिला व चिमूर पंचायत समितीवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेला संधी देण्यात आल्याने इच्छुकांचा स्वप्नभंग झाला आहे. चंद्रपूर व ब्रह्मपुरी पंचायत समितीवर ओबीसी महिला सभापती पद भूषविणार आहे. यातच सावली, पोंभुर्णा व वरोरा पंचायत समितीमध्ये सभापती होण्याचा मान सर्वसाधारण गटातील महिलेला मिळाल्याने अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे. पंचायत समिती आरक्षणचंद्रपूरओबीसी महिलाब्रह्मपुरीओबीसी महिलाभद्रावतीएससी सर्वसाधारणनागभीडओबीसी सर्वसाधारणकोरपनाओबीसी सर्वसाधारणजिवतीएसटी महिलासिंदेवाहीएसटी सर्वसाधारणराजुराखुला सर्वसाधारणबल्लारपूरखुला सर्वसाधारणगोंडपिपरीखुला सर्वसाधारणसावलीखुला प्रवर्ग महिलापोंभुर्णाखुला प्रवर्ग महिलावरोराखुला प्रवर्ग महिलाचिमूरएसटी महिलामूलएसटी महिला
आठ पंचायत समित्यांवर महिलाराज
By admin | Published: January 11, 2017 12:34 AM