लीलाबाई गोंगल यांची पांजरेपार येथे शेती आहे. यांच्या शेताजवळ पोलीस पाटील नानाजी लोखंडे यांची शेती आहे. लोखंडे यांचा शेतात जाण्याचा वेगळा मार्ग असताना ते जाणीवपूर्वक उभ्या पिकांतून जातात. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. त्यांना मनाई केल्यास ते वाद करीत असतात. १ ऑक्टोबर २०२० रोजी शीतल अमोल लोखंडे हिने लीलाबाई गोंगल यांच्या मुलाला शिवीगाळ करून केस ओढून मारहाण केली. त्याची तक्रार शंकरपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. याचा वचपा घेऊन दुसऱ्या दिवशी लोखंडे यांनी आपल्या नातेवाइकांसोबत गोंगले यांच्या घरात घुसून मारहाण केली. याबाबत पोलीस चौकीमध्ये तक्रार केली. परंतु, पोलिसांनी लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल न करता, त्यासह असलेल्या चार सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे लोखंडे कुटुंब पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत असल्याने जीवितास धोका आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करावा, तसेच नानाजी लोखंडे यांना पोलीस पाटील पदावरून हटवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून लीलाबाई गोंगल यांनी केली आहे.
घरात घुसून वृद्ध महिलेस मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस पाटील मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:52 AM