लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.जिल्ह्याच्या तापमानात दरवर्षी प्रमाणे यंदाही उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचा भडका उडाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तप्त उन्हात बाहेर पडायची हिंमत कुणीही करीत नाही. मात्र, ऊन वारा असो की पाऊस शेतकºयांना शेतात राबल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. गतवर्षी शेतकºयांनी शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्चच अधिक वाढल्याने शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी नेहमीच होरपळ होत आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपल्याने शेतीवर अवकळा आली. मागील हंगामाच्या उत्पादनाचा टक्का घसरला. यावषीर् शेतकºयांनी शेतमाल विकल्यानंतर दर वाढल्याने त्याचा लाभ शेतकºयांना होण्याऐवजी व्यापाºयांना झाला. यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतीवर शेतकºयांचा वर्षभराचा बजेट अवलंबू असतो. पण, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतकºयांना अािर्थक संकटाचा सामना करावा लागत आहे. ४५ अंशाच्या तापमानातही शेतकºयांना शेतीची कामे करावी लागत आहे. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी दरवर्षी निराशाच येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सिंचनाची कमतरता आदी कारणांमुळे शेतकरी होरपळून निघत आहे. याचे राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नापिकीकडे दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचे नुकसान होत असल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तापमानाने उच्चांक गाठल्याने लाहीलाही होत आहे. मागील वर्षी अल्प पाऊस पडले. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढले आहे. चाºयाची तिव्र टंचाई जाणावायला लागल्याने बेहाल झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही वेळ आल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.जनावरांचे हालनदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरपना तालुक्याकडे लक्ष द्यावे.
रखरखत्या उन्हात शेतीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:32 AM