शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:06 PM

मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : गुंतवणूकदारांच्या पैशाचा प्रश्न अधिवेशनात मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे. त्यामुळे नाशिक येथील न्यायालयाचा निकाल संपूर्ण राज्यभर लागू करावा, कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून ग्राहकांच व प्रतिनिधींचे पैसे परत करावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांनी नागपूर येथे आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले.मैत्रेय कंपनीमध्ये राज्यातील २२ लाख प्रतिनिधी काम करीत असून तब्बल दोन हजार ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र सदर कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यापासून गुंतवणूकदारांचे पैसे मिळाले नसल्याने मोठी अडचण जात असल्याने गुंतवणूकदारांनी सदर प्रश्न अधिवेशानात उचलावा, या मागणीसाठी आमदार वडेट्टीवार यांना निवेदन दिले.सरकार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर नसल्यामुळे मैत्रेयमध्ये गुंतवणूक केलल्या गुंवतणूकदारांची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. मैत्रेयमध्ये गुंतवणूकीमुळे अनेकांची मेहनतीची कमाई अडकून पडली आहे. मात्र गुंतवणूकदारांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे बैठक लावणार यासोबतच सभागृहाबाहेरही आवाज उठविण्याची ग्वाही काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक शेख जैन्नुद्दीन, सिध्दार्थ जगताप, प्रविण बावणे, दिवाकर रागीट, मंगेश खेल्लुरकर, शिला टाले, सुमित्रा कुचनकर, माया पेंदोर, छाया निमगडे, माया नंनुरवार, वंदना कातवडे, वनिता खेल्लुरकर, राजेश पाटील, धनराज बहादे यांच्यासह अनेक गुंतवणूकदार व एंजट उपस्थित होते.