पर्यावरण व वातावरण बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने उपक्रम सुरू आहेत. शाळेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई-शपथ घेऊन सामाजिक बांधीलकी जपली. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, सिसम, नीलगिरी, आवळा, अशोक, लिली, सदाफुली, पाम, तुळस, आदी विविध फूलझाडे लावण्यात आली. यावेळी समृद्ध पर्यावरण रक्षणाकरिता खतनिर्मिती, नैसर्गिक अधिवासात जगणारे पशुपक्षी व जलचर प्राणी यांची जैवविविधता जपण्याचा संकल्प करण्यात आला. कागदी, कापडी व पिशवी वापरूया, पर्यावरण वाचवूया, असा संदेश यावेळी दिला. उपक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक आर. बी. विधाते, ए. वाय. बांगरे, पी. यू. गिरडकर, आदींचे सहकार्य लाभले.
लोक विद्यालयात ‘ माझी वसुंधरा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:25 AM