लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे. असे असले तरी हे अभियान निरंतर प्रक्रियेतून सातत्याने सुरु राहणे व या मोहिमेचे जनचळवळीत रुपांतर करणे, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीची जाबाबदारी व कर्तव्य आहे. केवळ शासकीय पातळीवरुन या अभियानाची यशस्वीता निर्भर नसल्याने लोकांनी एक सामाजिक व राष्टÑापुढील आव्हान समजून स्वच्छतेच्या मोहिमेला वाहून घेत राष्टÑाच्या पर्यायाने लोकांच्या हितासाठी या चळवळीचा धागा बनून कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.२५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत राष्टÑीय पातळीवर आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना ते बोलत होते.स्थानिक कोहीनूर क्रीडांगणात चंद्रपूर शहर महानगरपालिका व इको-प्रो या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोन्हेरी तलाव व या लगतच्या ऐतिहासीक परकोट स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, इको-प्रोचे बंडू धोतरे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, अधिष्ठाता डॉ. मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा सभापती अनुराधा हजारे, धनंजय हुड, प्रा. रवी जोगी, प्रमोद शास्त्रकार, संजय मिसलवार, राजेंद्र कागदेलवार, राजू घरोटे, अशोक सोनी, श्रीकांत भोयर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, इको-प्रोचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.इको-प्रो सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थानी या कार्यात योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत अभियान जनचळवळीचे माध्यम बनावे -हंसराज अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:10 AM
स्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज असून अशा भूमिकेमधूनच या अभियानाची सफलता शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयान्ाां हाक देताच स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार मोठी झेप घेतली आहे.
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान हे सामूहिक चळवळीशी जुळणे काळाची गरज