शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:01 PM

मूल येथे शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये दिल्या. राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल येथे शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये दिल्या.राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिराचा आजपर्यंतच्या तयारीचा आढावा व पुढील काळातील तयारीचे, कामांचे नियोजन यासंबंधीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.बैठकीमध्ये आदिवासी विकास, समाज कल्याण, कृषी, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, वन, कौशल्य विकास, पोलीस, परिवहन, बँका व आर्थिक विकास महामंडळे आदी विभागांनी आजपर्यंत केलेल्या तयारीचा योजनानिहाय आढावा घेण्यात आला. याबाबत ४ डिसेंबर २०१८ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन आर. बोरकर, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ठरवलेल्या कामांपैकी किती कार्यवाही झाली याचा तपशील घेण्यात आला. यापुढे तसेच स्थानिक पातळीवर याचा समन्वय ठेवण्यासाठी मुलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून विभागनिहाय उपसमित्या स्थापन करण्याची सुचनासुद्धा त्यांनी दिल्या.बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, आदिवासी विकास अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव किरण जाधव, मुलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार राजेश सरवदे, गटविकास अधिकारी अतुल भोसले व प्रदीप पांढरवळे, शासकीय विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवडाभरात लाभार्थ्यांचा तपशील द्याप्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आदिवासी व समाज कल्याण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधिकारी आदींनी गावनिहाय तसेच सेवा, योजनानिहाय नियोजन करून लाभार्थ्यांचा सविस्तर तपशील अहवाल पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी दिले.