बॉक्स
शहरात स्थूलता ही नवी समस्या
शहरामध्ये आई-वडील दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करणारे असतात. त्यामुळे आर्थिक सुबत्ता असल्याने मुलांचे सर्व हट्ट पालकांकडून पूर्ण केले जातात. लॉकडाऊन काळात विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाणे किंवा हॉटेलमधून मागवून खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. याउलट मैदानी खेळ बंद झाले. घरीच राहून टीव्ही पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे आदी कारणांनी स्थूलपणा वाढत आहे.
बॉक्स
कारणे काय
शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. टीव्ही, मोबाईलचा वापर वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत.
मैदानी खेळ, पीटीचे तास बंद झाले आहेत.
आईस्क्रीम, मैद्याचे, तेलकट पदार्थ, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शरीराला प्रथिनेयुक्त आहार मिळत नसल्याने स्थूलता वाढत आहे.
बॉक्स
पालकांची चिंता वाढली
मागील दीड वर्षापासून मुले घरीच आहेत. टीव्ही किंवा मोबाईल बघतच असतात. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल देणेसुद्धा अनिवार्य झाले आहे. त्यामुळे तोसुद्धा मोबाईल घेऊन खेळत असतो. घराबाहेर खेळायला जा म्हटले तरी जाण्यास तयार होत नाही.
- सरिता रायपुरे
-----
मोबाईलपुढे मुलाला जेवणाची वेळसुद्धा लक्षात राहत नाही. वेळी-अवेळी जेवण करतो. याउलट पॅकबंद पदार्थ, जंकफूडचा आग्रह करतो. इतर जेवण दिल्यास नकार करतो. उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी खावे म्हणून नाइलाजाने मग त्याला मागेल ते द्यावे लागते.
-प्रतीक्षा माधमशेट्टीवार
--------
कुपोषण ही आर्थिक, सामाजिक व वैद्यकीय समस्या आहे. कुपोषण मुक्तीसाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. कुपोषण म्हणून जन्मलेल्या मुलाला विविध समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्याचे दूरगामी परिणामसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शासनाने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच कुपोषण टाळण्यासाठी मातांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे. तर कोरोनाने मैदानी खेळ, शाळा बंद आहेत. घरीच राहणे सुरू असल्याने अनेकांमध्ये लठ्ठपणा दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे.
डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर