गोंडपिपरी : धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून संस्थेचे माजी सचिव वासुदेव सातपुते व माजी अध्यक्ष भाऊजी मडावी यांच्या कार्यकाळात संस्थेत लाखोंचा अपहार झाला असल्याची तक्रार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्यामार्फत करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष मंदाबाई दत्तू कुळमेथे यांनी पत्रपरिषदेत दिली.
आदिवासींच्या हाताला काम देऊन जंगलातील कामे पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या हेतूने तालुक्यात धामणपेठ जंगल कामगार सहकारी संस्था अस्तित्वात आली. काही महिन्यांपूर्वी या संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊजी कुळीराम मडावी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करून १६ एप्रिल २०२१ ला पुनर्निवडणूक घेण्यात आली. त्यात खेमचंद गरपल्लीवार यांच्या गटाचा बहुमताने विजय झाला आणि आपली अध्यक्षपदावर वर्णी लागल्याचे मंदाबाई दत्तू कुळमेथे यांची सांगितले.
संस्थेत गैरव्यवहार घडवून आणणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात संचालक मंडळाच्या मासिक सभा झाल्या नाही. तरी देखील रजिस्टरवर सभा झाल्याच्या नोंदी नमूद केल्या आहेत. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व सचिव या दोघांच्या संगनमताने व्यवहारात लाखोंची अफरातफर झाली असल्याचा आरोप संस्थेचे सत्ताधारी गटाचे सल्लागार खेमचंद गरपल्लीवार तसेच विद्यमान अध्यक्ष मंदाबाई दत्तू कुळमेथे यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भातील तक्रार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट
माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून संस्थेच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अनियमितता झालेली नाही. संस्थेकडे माझे थकित वेतन घेण्याकरिता कामगार आयुक्तांकडे दाद मागितली असून नाहक बदनामी करणाऱ्या आरोपकर्त्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार.
-वासुदेव गणपत सातपुते, तत्कालीन सचिव, जंगल कामगार सहकारी संस्था धामणपेठ, गोंडपिपरी.
===Photopath===
200621\img-20210616-wa0014.jpg
===Caption===
पत्रपरिषदेत माहिती देताना संस्थेचे पदाधिकारी व मार्गदर्शक