भद्रावती : रोटरी क्लब आॅफ भद्रावतीद्वारा मॅमोग्राफी बससेवा शिबिराचे आयोजन काल बुधवारी स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबिराचा ९८ रुग्णांनी लाभ घेतला.शिबिराचे उद्घाटन सुनीता बंग यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.माधवी मिलमिले तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजली कुमावत, पोलीस उपनिरीक्षक मेघाली गावंडे, रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष अविनाश सिद्धमशेट्टीवार, सचिव प्रा. विनोद घोडे, माजी अध्यक्ष डॉ. प्रविण केशवानी, डॉ.रमेश मिलमिले, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, विवेक आकोजवार व्यासपीठावर उपस्थित होते. या मॅमोग्राफी बससेवा शिबिरात स्तनाच्या व गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान करण्यात आले. मॅमोग्राफी बससेवेच्या माध्यमातून पॅप स्मीअर टेस्ट चिकित्सा मोफत करण्यात आली. या शिबिरात मॅमोग्राफी बससेवीची तज्ज्ञमंडळी उपस्थित होती. त्यात केशव मोसरे, माधरी सेवईकर, प्रिती खेडकर, अस्मिता खैरकर, वैशाली विशांदे व अर्चना जयस्वाल यांनी रुग्णांची तपासणी केली. रोटरी क्लबने आयोजित केलेले आरोग्य विषयक शिबिर हे अत्यंत स्तुत्य असून अशा प्रकारच्या आरोग्य विषयक कार्यक्रमास भद्रावती येथील डॉक्टर्स सहकार्य करतील, असे डॉ.रमेश मिलमिले याप्रसंगी म्हणाले. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. मित्र म्हणून आपले सहकार्य आम्हाला आवश्यक असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मेघाली गावंडे म्हणाल्या. शिबिरात लाभ घेतलेल्या रुग्णांची नोंदणी मदन ताठे व भाविक तेलंग यांनी केली. यशस्वीतेसाठी योगेश मत्ते, विशाल बोरकर उपस्थित होते.
रोटरी क्लब भद्रावतीतर्फे मॅमोग्राफी बससेवा शिबिर
By admin | Published: February 04, 2017 12:43 AM