चंद्रपूर : येथील बल्लारपूर बायपास मार्गावरील मनपाच्या डम्पिंग यार्डला आग लागली. हा प्रकार दुपारी २ वाजतानंतर उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच, महानगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने आगीवर सुमारे पाच बंबातील पाण्याचा मारा केल्यानंतर दीड तासाने ही आग आटोक्यात आली. या घटनेने या डम्पिंग यार्डची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. महानगर पालिकेचा डम्पिंग यार्ड २० एकरमध्ये विस्तारला असून जवळपास १५ एकरवर कचऱ्याचे ढिगारे उभे आहेत. मनपाने कचरा उचलण्याचा ठेका एका कंपनीला दिला असून या कंपनीचे कामगारांकडून वॉर्डावॉर्डातून गोळा करतात. तो कचरा त्याच परिसरातील एका विशिष्ट कचराकुंडीत साठविल्या जातो. त्यानंतर वाहनाद्वारे तो कचरा डम्पिंग यार्डवर नेऊन टाकला जातो. मात्र गंभीर बाब ही की, या डंपींग यार्डवर पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या डम्पिंग यार्डला कुंपण लावण्यात आले आहे. मात्र तरीही या भागातील काही रहिवाशांनी कुंपण तोडून डम्पिंग यार्डमधून ये-जा सुरू केली आहे. यातून एखादवेळी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजची घटनादेखील अशातून (प्रतिनिधी)अंतुर्ला गावात झाडाला आगघुग्घुस: येथून जवळच असलेल्या अंतुर्ल गावातील एका झाडाला आग लागली. अग्निशामक दलाने आग विझविली. मात्र दुसऱ्याही दिवशी पुन्हा त्याच झाडाला आग लागली. त्यामुळे हा विषय नागरिकांसाठी कुतूहलाचा ठरला आहे. सोमवारी पहाटे या गावातील लोकवस्तीतील एका झाडाला आग लागली. ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिक भयभीत झाले. याबाबत माहिती मिळताच जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी अंतुर्ला गाव गाठले व एसीसीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळविले. मंगळवारी सकाळी पुन्हा त्याच झाडाला आग लागली आणि आजही अग्निशमन दलाच्या मदतीने ती विझविण्यात आली. सदर घटनेबाबत नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी एका मंदिराचे बांधकाम करण्यासाठी चबुतरा तयार केला आहे. मात्र मंदिराचे काम न झाल्यानेच हा आगीचा प्रकार घडल्याची अफवा पसरविली जात आहे.घनकचरा कचऱ्याचा प्रश्न गंभीर२० एकर परिसरात असलेल्या डम्पिंग यार्डमध्ये आज घडीला. पाच लाख टन कचरा आहे. त्यातील केवळ दिड ते दोन लाख टन घनकचरा आहे. उर्वरित माती व इतर कचरा आहे. या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगर पालिकेकडून सशक्त कंत्राटदाराचा शोध घेतला जात आहे. मात्र घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची प्रक्रिया अतिशय किचकट आणि खर्चिक असल्याने कंत्राटदारच सापडत नसल्याची माहिती आहे.
मनपाच्या डम्पिंग यार्डला भीषण आग
By admin | Published: February 17, 2016 12:50 AM