लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय पेपरलेस व्हावे, यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच दिले. संगणक ऑपरेटरची नियुक्तीही करण्यात आली. मात्र अल्प वेतनामुळे अनेकांनी नोकरी सोडली. परिणामी बहुतेक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकच नाही. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीचे संगणक धूळ खात पडले आहे. परिणामी ई-ग्रामपंचायतींचा फज्जा उडाल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहे.२१ वे शतक माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात संगणकाच्या माध्यमातून गतीमानता यावी, तसेच ग्रामपंचायती शहरातील प्रमुख कार्यालयांना जोडता यावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने संगणक देण्याचा निर्णय घेतला. लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक देण्यात आले. परंतू गेल्या कित्येक महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणकाद्वारे कामच होत नाही. ज्या दिवशी संगणकावर ऑनलाईन काम असते त्या दिवशी ऑपरेटर ग्रामपंचायत कार्यालयात दिसतात. अन्य वेळी मात्र विविध प्र्रकारचे देण्यापासून घरपट्टी, पाणीपट्टीच्या पावत्या, ग्रामसेवकाला हातानेच लिहून द्याव्या लागतात. परिणामी संगणकाचा वापर अतिशय कमी प्रमाणात होताना दिसत आहे.गावागावात ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर नेमण्यात आहे. मात्र यांना अल्प वेतन मिळते. त्यातही आठ ते दहा महिने त्यांना वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी नोकऱ्या सोडल्या. बहुतेक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकच नाही. तर मागील काही दिवसांपासून या संगणक परिचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत तर दाखल हे हस्तलिखितच मिळत आहेत.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधीक ग्रामपंचायतचा कारभार आहे. परिणामी ते आठवडाभरातील दिवस विभागून काम करीत असतात. त्यामुळे त्यांना वेळ नाही. परिणामी ग्रामपंचायत कार्यालयाला संगणक देऊनही ते धुळखात पडले आहेत. त्यामुळे सरळ हाताने लिहिलेले दाखले दिले जातात. संगणक परिचारकांची समस्याही ग्रामपंचायतींना भेडसावत असतो. अनेक ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कामबंद आंदोलनासह उपोषणही सुरू केले असल्याने अडचण जात आहे.प्रशिक्षणाचा अभावमाहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक काम संगणकावर केले जात आहे. ग्रामपंचायतीनाही संगणक देण्यात आले. मात्र संगणकाचे पुरेसे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक गावात आता संगणक शोभेचे ठरले आहे. ग्रामसेवकांनाही संगणक सुरू करण्यासाठी वेळ नसतो. अनेक ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक गावाचा प्रभार आहे. त्यामुळे त्याचे याकडे दुर्लक्ष होते. ग्रामपंचयातीचे कर्मचारी आणि संगणक परिचालकही कुणाचे ऐकत नसल्याचा आरोप होत आहे. संगणक परिचालकाच्या विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने तेही हवे तसे सहकार्य करीत नाही.
संगणक युगात हस्तलिखित दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:46 AM
गावागावात ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर नेमण्यात आहे. मात्र यांना अल्प वेतन मिळते. त्यातही आठ ते दहा महिने त्यांना वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी नोकऱ्या सोडल्या. बहुतेक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकच नाही. तर मागील काही दिवसांपासून या संगणक परिचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत तर दाखल हे हस्तलिखितच मिळत आहेत.
ठळक मुद्देई-प्रशासनाचा फज्जा। ग्रामपंचायतमधील संगणक कुचकामी