शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

अनेक रुग्णवाहिकांची आरटीओत नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी रुग्णवाहिका सांभाळताना अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही.

ठळक मुद्देलोकमत वृत्ताचे सोशल मीडियावरून कौतुक : रुग्णालय परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘जिल्ह्यात रुग्णवाहिकांची दुकानदारी तेजीत’ अशा आशयाचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी दवाखाना परिसरात याच वृत्ताची चर्चा होती. सोशल मीडियावरूनही लोकमत वृत्ताचे कौतुक करीत त्यांना रुग्णवाहिकांबाबत आलेल्या वाईट अनुभवाची गाथा सांगितली. दरम्यान, खासगी रुग्णवाहिकांबाबत आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्ह्यात फिरणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांची आरटीओ कार्यालयात रुग्णवाहिका म्हणून नोंद नसल्याचीही माहिती आहे.चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी रुग्णवाहिका सांभाळताना अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही. खासगी रुग्णवाहिका म्हणून आरटीओ कार्यालयात केवळ ४१ रुग्णवाहिकांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात शंभरावर खासगी रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत आहेत. यातील अनेक रुग्णवाहिकांची आरटीओ कार्यालयात नोंदच नाही. केवळ चारचाकी वाहन म्हणून या रुग्णवाहिकांची नोंद असल्याचीही माहिती आहे. रुग्ण नसताना अशा रुग्णवाहिकांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.चालकांना प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण हवेरुग्णवाहिकेच्या चालकांना आरोग्यासंबंधी प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणे अपेक्षित आहे. काही तातडीच्या वेळी चालक रुग्णाची व रुग्णवाहिकेतील साहित्याची काळजी घेऊ शकला पाहिजे, यासाठी हे प्राथमिक प्रशिक्षण हवे असते. मात्र अनेक रुग्णवाहिकेच्या चालकांना असे प्रशिक्षण देण्यात येत नाही.१०८ रुग्णवाहिकेचा कारभार पारदर्शक-बीव्हीजी१०८ क्रमांक लावताच तत्काळ रुग्णाला रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. १०८ क्रमांकावर फोन लावताच तो कॉल थेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर पुणे येथे जातो, थेट रुग्णवाहिकेच्या चालकाकडे नाही. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकाचे खासगी चालकासोबत कुठलाही व्यवहार नसतो, असे बीव्हीजीने स्पष्ट केले आहे. यासोबतच रुग्णवाहिका जीपीएस प्रणालीद्वारे जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका कुठे जाते, हेदेखील कळते असते, असेही त्यांनी ‘लोकमत’ला पाठविलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे.कोणत्याही रुग्णाची लूट नाही- रुग्णवाहिका संघटना’लोकमत‘मध्ये ‘जिल्ह्यात रुग्णवाहिकांची दुकानदारी तेजीत’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच खासगी रुग्णवाहिका चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही चालकांनी लोकमत कार्यालयात येऊन आपली बाजु मांडली. खासगी रुग्णवाहिका चालक आजारी, गरजू नागरिकांना तत्काळ रुग्णवाहिका सेवा पुरवतात, यातून त्यांना मदत करणे हे हेतू असतो. सोबतच चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यातून करतो. यात जादा पैसे उकळून कोणत्याही रुग्णाची लूट केली जात नाही, असे प्रायव्हेट रुग्णवाहिका चालक, मालक संघटनेने स्पष्ट केले. रुग्णांसोबत सेवाभाव वृत्तीच ठेवली जाते. एखादा चालक रुग्णाची लूट करताना आढळल्यास संघटनेमार्फत त्यावर तोडगा काढला जाईल, असे संघटनेने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.रुग्णवाहिका चालकाला कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा नियम नाही. गंभीर रुग्ण असेल तर रुग्णवाहिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व इमर्जन्सी सोईसुविधा पुरविल्या जातात.- एस. एस. मोरे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस