शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

माती परीक्षणाबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:16 PM

शेतकरी दरवर्षी पिकांची लागवड करतात. मात्र त्यांना जमिनीच्या सुपिकतेची कोणतीही माहिती नसल्याने समाधानकारक उत्पन्न हातात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तरीही उत्पन्न वाढत नाही. मात्र माती परीक्षणातून उत्पादन वाढीची समस्या सुटू शकते. याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ असून तालुकास्थळीही माती परिक्षण करता येते.

ठळक मुद्देतालुकास्थळी सेवा उपलब्ध : माती परीक्षण करूनच घ्यावे उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकरी दरवर्षी पिकांची लागवड करतात. मात्र त्यांना जमिनीच्या सुपिकतेची कोणतीही माहिती नसल्याने समाधानकारक उत्पन्न हातात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तरीही उत्पन्न वाढत नाही. मात्र माती परीक्षणातून उत्पादन वाढीची समस्या सुटू शकते. याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ असून तालुकास्थळीही माती परिक्षण करता येते. यातून जमिनीची सुपिकता कळणार असून त्यानुसारच पिकाची लागवड करणे सोपे जाणार आहे.सध्या खरिप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांची जुळवाजुळव करीत असून गतवर्षी कापूस पिकावर बोंड अळीचा तर धान पिकावर मावा-तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कोणत्या पिकाची व वाणाची लागवड करावी याबाबत शेतकरी विचार करीत आहेत. मात्र पिकाची लागवड करताना आपल्या जमिनीची सुुपिकता तपासल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.शेतकरी जमिनीचे परीक्षण न करता विविध प्रकाराची खते आणि कीटकनाशकांची फवारणी करतात. यातून जमिनीचा पोत बिघडतो. उत्पन्नात कमालीची घट होत असते. यासाठी मातीची तपासणी करणे गरजेचे असून कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात अतिशय कमी शुल्कात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी जागृत होऊन खरिप हंगामापूर्वी माती परीक्षण करण्याची गरज आहे.पिकांची नोंदणी करावीसर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी. प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती एकत्र मिसळावी. तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत. त्यानंतर पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत. अशा तºहेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत हीच क्रिया करावी. मातीच्या नमुन्यासोबत शेतकºयाचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे गट नंबर आणि पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून जिल्हास्थळ अथवा संबंधित तालुक्यातील माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.माती नमुना घेण्याची अशी आहे पद्धतनमुना काढण्यासाठी प्रथम शेतीची पाहणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. त्यानंतर जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच व सखलपणा, पाणथळ किंवा ओलसर जागा आदी बाबींचा विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमूना घ्यावा. एका हेक्टरमधून १५ते २० ठिकाणची माती घ्यावी. नमूना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी २५ सें.मी., तर फळपिकांसाठी ६० सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.ओलसर जमिनीचे नमुने टाळावेमातीचा नमुना घेण्यासाठी विविध अवजारांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमूना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वीच घ्यावा. पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत सदर जमिनीतून मातीचा नमूना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारची जमीन किंवा शेतातील मातीचे नमूने एकत्र मिसळू नयेत. माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापरू नये. शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाड, विहिर पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमूने घेऊ नयेत.