चंद्रपूर : मोबाईलच्या अधीन झाल्याने समाजातील लहान वयातील अनेक मुलांमध्ये विकृत विचारांची कीड निर्माण होत आहे. मार्गाने प्रवास करताना अनेकदा आसपासचे विद्यार्थी, तरुण मोबाईलशी चाळे करताना दिसतात. ही मुले सर्वाधिक स्थळी मोबाईलद्वारे अश्लील चित्रांचा, चलचित्रांचा आनंद लुटत असतात. बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या मल्टीमिडिया मोबाईल हॅडसेटमुळे विकृत सवयी सार्वजनिक झाल्या आहेत. अशा मोबाईलचा समाजावर दुष्परिणाम होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जग मुठीत आणणार्या मोबाईलने माध्यम व संवाद यांच्यात क्रांती आणली असली तरी हेच मोबाईल आता समाज स्वास्थ बिघडविणारे साधन ठरत आहेत. एकाच घरात राहून एकमेकांशी अधिक न बोलणारी मानस मोबाईलवर अव्याहतपणे वेळेच भान विसरुन बोलताना दिसतात. मोबाईलने घरातील मानसांना एकमेकांनापासून दूर केल्याचे चित्र शहरी भागासह आता ग्रामीण भागातही दिसत आहे. मोबाईल केवळ गाणे ऐकण्यापुरता र्मयादित राहिला नसून खुलेआम अश्लील गोष्टीचे प्रदर्शन करण्याकरिता याचा वापर अधिक होत आहे. सोबतच वायफाय व थ्री जी सेनेमुळे इंटरनेटच्या सुविधांचा गैरफायदा घेऊन फेसबूक सारख्या सुविधा लहान मुले घेताना सहन दिसते. मोबाईलचा चांगला वापर होण्याऐवजी गैरवापर अधिक होत आहे. मोबाईलमुळे सार्वजनिक स्थळ इत्यादी छायाचित्र तयार करण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागातही वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)
मोबाईलच्या गैरवापराने अनेकजण अडचणीत
By admin | Published: May 13, 2014 11:26 PM