विनायक येसेकर।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१० साठी भद्रावती शहर स्वच्छतेविषयी पूर्णता तत्पर असून नगराध्यक्ष अनिल धानोरकरसह संपूर्ण नगरपालिका टीम गेल्या कित्येक दिवसांपासून कामाला लागली आहे. शहरातील सामाजिक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच या स्वच्छतेसंदर्भात जाणीव करून दिली जात आहे. परंतु अजूनही काही नागरिकांना लागलेल्या चुकीच्या सवयी व विविध कारणे शहराला फाईव्ह स्टारचा दर्जा न मिळण्यासाठी अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.नगरपालिकाद्वारे बाजार वार्डात चिकन, मटण, मच्छी मार्केट साठी स्वतंत्र सोयी सुविधांचे मार्केट बांधण्यात आले. परंतु त्या मार्केटमध्ये मोचके व्यापारी व्यवसाय करत असून बहुतांश व्यवसायिक शहरातील बसस्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत असलेल्या मुख्य मार्गाने उघड्यावर मास विक्रीचे दुकान थाटून बसले आहे. भद्रावती शहर ऐतिहासिक शहर असून हे बौद्ध, जैन व हिंदू समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे भाविकांची चहलपहल असते. त्यामुळे मांस विक्रीसाठी पर्यायी जागा पालिकेने देणे गरजेचे आहे.मुख्य रस्त्यावर जनावरांचा वावरशहरातील विविध रस्त्यावर जनावरांचा २४ तास वावर असल्याचे चित्र दिसून येते. येथील काही जनावरमालकांनी त्यांची बहुतांशी जनावरे मोकाट सोडली आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असते. कित्येक अपघात हे जनावरांमुळे होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या वाहनांच्या धडकेत जनावरेसुद्धा ठार झाल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे.पादचाऱ्यांचे फुटपाथ काबीज केले व्यापाऱ्यांनीशहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते नाग मंदिरपर्यंत तसेच नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावरील फुटपाथ हे पादचाºयांना ये-जा करण्यासाठी बनविण्यात आले आहे. परंतु या संपूर्ण फुटपाथवर छोट्या-मोठया व्यावसायिकांनी, भाजी विक्रेत्यांनी तसेच फेरीवाल्यांनी संपूर्ण फूटपाथ काबीज केल्याने पादचाºयांना येजा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका कारवाई करतात. परंतु पुन्हा हे व्यावसायिक आपला व्यवसाय तेथेच थाटत असल्याने शहरात सुविधांचा अभाव दिसून येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१० साठी जोरदारी तयारी असून येथील नागरिकांनी, व्यवसायिकांनीसुद्धा आपल्या घराची ज्याप्रमाणे स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे शहरातील भाग तसेच स्वत:च्या दुकानासमोरील भाग स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. ज्यामुळे भद्रावती शहराला फाईव्ह स्टारचा दर्जा मिळेल.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, नगरपालिका, भद्रावती.अवैध पार्किंगशहरातील विविध बँका, विविध कार्यालय, दुकान, व्यावसायिक यांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंग झोनमध्ये वाहने ठेवण्याची व्यवस्था असूनसुद्धा विविध कामासाठी येणारे नागरिक वाहने कुठेही पार्क करून मोकळे होतात. त्यामुळे मुख्य मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच त्या रस्त्याने आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ही समस्या नेहमीच भद्रावती शहराच्या मुख्य मार्गाने होत असते. आठवडी बाजार बुधवारला तर चांगलीच वाहनाची कोंडी होत असते. परंतु या परिस्थितीला हाताळण्यासाठी येथील वाहतूक पोलीस राहत नाही.