३० जूनच्या आत कामे करा : अधिकाऱ्यांचे निर्देशभोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्कमूल: अपूऱ्या पाणीसाठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार अभियान योजना अस्तित्वात आली. सदर योजनेच्या २७९ कामांना मंजूरी मिळाली, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाकडे १३ कामे मंजूर होते, त्यापैकी अनेक कामे अपूर्ण आहेत. यामुळे सदर योजनेची अमंलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांनी सदर योजनेचे तिनतेरा वाजविल्याचे दिसून येत आहे.गावागावातील जलसाठ्यात वाढ करण्याच्या दुष्टीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार अभियान योजना अमंलात आणली, सदर योजनेअंतर्गत मामा तलाव दुरूस्ती, सिमेंट प्लग बंधारा, लघू पाटबंधाऱ्यांच्या दुरूस्तीच्या कामाव्यतीरिक्त इतरही कामे हाती घेण्यात आली. आजच्या स्थितीत २२७ कामे पूर्ण झालेली आहे. मूल तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या २७९ कामांना मंजूरी मिळालेली आहे. याकामांची अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. असे असतांनाही ३९ कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर १३ कामे रद्द करण्यात आलेले आहे, येथील लघुसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाकडे यापैकी १३ कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १० कामे सुरू आहेत. तर ३ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे.जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत तालुक्यात कामाला सुरूवात करण्यात आली असून यामध्ये कृषी विभागाने १९९ कामांना मंजूरी मिळाली, त्यापैकी १९० कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर ४ कामे सुरू असून ५ कामे रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. तर लघुसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाने १३ कामापैकी अजुनपर्यंत एकही काम पुर्ण केलेले नाही, उलट तालुक्यातील मामा तलाव दुरूस्ती मुरमाडी, केळझर व पडझरी येथील कामे रद्द करण्यासाठी प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठविलेला आहे.बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देशमूल तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत सन २०१६-१७ च्या आराखड्यानुसार मंजूर कामाबाबत १६ जून रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती, यामध्ये कृषी विभागाने १९० कामे, मनरेगा १५, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभाग ०, लघूपाटबंधारे ६ तर वनविभागाने १६ कामे पूर्ण केलेले आहे. मूल तालुक्यात केवळ लघू पाटबंधारे विभागानेच दिलेले कामे कालावधीत पूर्ण केलेले आहे . तर कृषी विभाग ४, मनरेगा ३, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभाग १० व वनविभाग २२ चे कामे अजूनही अपूर्ण आहेत. अपूर्ण कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी समितीला दिले. पावसाचे दिवस जवळ आलेले असतांनाही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जलयुक्त शिवार योजनेचे कामे अपुर्ण आहेत. या संबधाने लघूसिंचाई जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.
जलयुक्त शिवार योजनेची अनेक कामे अपूर्ण
By admin | Published: June 22, 2017 12:42 AM