चंद्रपूर : श्री महर्षी विद्या मंदिर येथे मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीलक्ष्मी मूर्ती, उपमुख्यध्यापिका निशा मेहता उपस्थित होत्या. यावेळी शालेय विद्यार्थिनी गौरवी पत्तीवार, आर्य आईंचवार यांनी मराठी दिवसाची महती सांगितली. त्यानंतर सहावीच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. यामध्ये सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बहिणाबाई चौधरी यांची भूमिका गौरी मोहितकर, आरोही दखणे, वासवी चिमरालवार, अभा निर्मळे यांनी सादर केली. रतन पेलणे यांनी नृत्य सादर केले. यावेळी गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, सदस्य वीरेंद्र जयस्वाल आदींनी आपल्या मार्गदर्शनातून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. संचालन सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा कल्लपल्लीवार, आभास राचलवार तर आभार शुभ्रा कल्लपल्लीवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शालू काळे, स्वाती टिकेकर, प्रणिता सुर्वे, मृणाल लिंगे, पवन महादूरकर, पुष्पा झोडे, रूपेश बोडे आदींनी परिश्रम घेतले.
बॉक्स
कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
चंद्रपूर : सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख रवींद्र पडवेकर उपस्थित होते. यावेळी कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुचिता खोब्रागडे, प्रा. अश्विनी सातपुडके, प्रा. वनिता हलकरे, प्रा. शमीना अली, ग्रंथपाल चंदन जगताप, शिक्षकेतर कर्मचारी मोरेश्वर गावतुरे, विजय बाळबुधे आदी उपस्थित होते.