लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी महोत्सवाच्या रविवारी शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरूणाई सहभागी झालेल्या महोत्सवाला रंगत आली होती.ब्रह्मपुरी महोत्सवाने नागरिकांच्या आनंदासोबत मनोरंजनाची मेजवाणी उपलब्ध करून दिली. आरोग्य शिबिर, शहर स्वछता, विविध आकर्षक झांकी, महामानवांच्या पुतळ्यांची स्वच्छता, होम मिनिस्टर, श्रीकृष्ण, डॉ. भीमराव आंबेडकर नाट्याचे सादरीकरण, कृषिप्रदर्शनी यशस्वी आयोजन करून महोत्सवाची उंची वाढविण्यात आली. क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या. रविवारी सकाळी शिवाजी चौकातून वृद्धांपासून ते बालकांपर्यंत मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेमुळे शिवाजी चौक, ख्रिस्तानंद चौकातील वर्दळीच्या ठिकाणांची वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धेला यंदाच्या महोत्सवात आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे. आयोजक आमदार विजय वडेट्टीवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेस्वर, भानारकर,वनकर आदींनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात केली. यावेळी मारोतराव कांबळे, अतुल लोंढे प्रवक्ते, देवीदासजगनाडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिता उराडे , प्रमोद चिमुरकर विलास विखार, नगरसेविका,लता ठाकूर निलिम सावरकर, सुनीता तिडके सरिता पारधी, महेश भर्रे, प्रितिश बुरले प्रतिभा फुलझेले संजय ठाकूर माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी व विविध संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.अनुराग पाटणकर यांचे व्याख्यानरविवारी दुपारी नागपुरातील अनुराग पाटणकर यांचे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अझीझुल हक, शिवानी वडेट्टीवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पाटणकर यांनी युवक-युवतींशी संवाद साधून विषयाची मांडणी केली.ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारब्रह्मपुरी महोत्सवाने वैचारिक प्रबोधनावरही यंदा भर दिला होता. सर्व घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांचे योगदान लक्षात घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजाचे दीपस्तंभ म्हणून ज्येष्ठांचा गौरव करत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
मॅरेथॉन स्पर्धेने महोत्सवाला रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:22 PM
ब्रह्मपुरी महोत्सवाच्या रविवारी शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरूणाई सहभागी झालेल्या महोत्सवाला रंगत आली होती.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग : विविध उपक्रमांमुळे ब्रह्मपुरी महोत्सव लक्षवेधी