वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी मार्केट यार्डमध्ये संचारबंदी काळात सकाळी ११ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी सुरू ठेवली. कोरोना संकटात बाजार समितीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता सर्व उपाययोजना मार्केट यार्ड परिसरात केल्या. मार्केट यार्डमध्ये सामाजिक अंतराची पायमल्ली होणार नाही याकरिता विशेष खबरदारी घेतली जाते. मागील काही दिवसांत मार्केट यार्डमध्ये मुंग, चना, सोयाबीन आधी शेतमालाची दीड हजार क्विंटल विक्री झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढचा हंगाम एक महिन्यावर आला असताना बी-बियाणे खते खरेदीचे नियोजन करता येणार आहे.
शेतमाल विकण्याकरिता हा हंगाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतमाल खरेदी कोरोनाच्या संकटात सुरू ठेवली. कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात असतानाही बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भीती बाळगली नाही. आपले कर्तव्य चोख बजावीत असल्याने त्यांचा संचालक मंडळास अभिमान आहे.
- राजेंद्र चिकटे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा.