शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:44 PM

आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्थिक हतबलता : वरोऱ्यात तीन लाख क्विंटल कापूस तर नागभीड येथे ५० हजार क्विंटल धान खरेदी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. शनिवारपर्यंत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन लाख पाच हजार ७६ क्विंटल कापूस, तर नागभीड समितीमध्ये ४८ हजार ८५२ क्विंटल धान खरेदी झाली. शेतमालास जादा भाव मिळेल, या हेतूने काही शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. पण, ही संख्या कमीच आहे. सोयाबीन, कापूस आणि धानाला समाधानकारक भाव मिळत नसला, लोकांची देणी फे डून कर्जाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता पर्यायच उरला नाही.नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, मूल तालुक्यांमध्ये या हंगामात धानाची सर्वाधिक लागवड करण्यात आली. यंदा पावसाने सुरुवातीलाच दगा दिला त्यामुळे रोवणीची वेळ निघून गेली. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकºयांनी पावसाची प्रतिक्षा करून हैराण झाले होते. हंगाम टळेल, या भितीने अनेक शेतकºयांनी कशीबशी रोवणी उरकविली. पावसाचा अभाव आणि विविध किडींनी धान पिकावर हल्ला केल्याने एकरी उत्पादकता घटली. त्याचा जोरदार फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि वर्षभरातील कुटुंबाचा ताळमेळ कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला. शासनाने शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पण, त्यातही कटकटी वाढवून ठेवल्या. या वर्षी पाऊस उशीरा आल्यामुळे शेतमाल बाजारात निराशा पसरली होती. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात झाली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चूरणे केल्याने आता धान्य विक्रीला वेग आल्याचे दिसून येत आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये ५४ हजार ११५ क्विंटल धान खरेदी झाली. गेल्या वर्षी खरेदीने उच्चांक गाठला होता. ब्रह्मपुरीत २०० क्विंटल धान्याची आवक झाली असून, मूल बाजार समितीमध्ये शनिवारपर्यंत ४० हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. सिंदेवाही बाजार समितीमध्ये केवळ एक हजार क्विंटल धान्य खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठशेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. शेतमाल विक्रीकरिता सात व अन्य कागदपत्रांच्या अट लागू केल्याने शेतकरी दुरावले. परिणामी, शेतमाल खरेदी केंद्राला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे.लूट होण्याचा धोकारबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण, खरीप हंगामात अल्प उत्पादन झाले. त्यातून लागवडीचा खर्चही हाती येणार की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकल्यानंतर लगेच चुकारे मिळतात, या आशेने शेतकरी शेतमाल विकत आहेत. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापारी व बाजार समित्यांवर चौकशी समित्या पाठवून संभाव्य लुटेला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदीकोरपना बाजार उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. नाफेडतर्फे २९५ क्विंटल खरेदी झाली असून, २ हजार ५०० ते ३ हजार ६२ रुपये प्रती क्विंटल भाव सोयाबिनला दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने बरेच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.