शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कापूस नोंदणीसाठी पणन महासंघ ‘तेलंगणा पॅटर्न’ स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:19 PM

कापूस खरेदी व चुकारे करताना अडचणी येवू नये, यासाठी तेलंगणा राज्याने वापरलेल्या मोबाईल अ‍ॅपप्रमाणे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडूनही यंदाच्या हंगामापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

ठळक मुद्देपणन महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी मोबाईल अ‍ॅपचुकाऱ्यांची प्रक्रिया सुलभ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस खरेदी व चुकारे करताना अडचणी येवू नये, यासाठी तेलंगणा राज्याने वापरलेल्या मोबाईल अ‍ॅपप्रमाणे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडूनही यंदाच्या हंगामापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी केल्यास चुकाऱ्यांची प्रक्रिया सुलभ होणार, असा दावा पणन महासंघाकडून केला जात आहे.राज्यात २०१९-२० च्या हंगामात सीसीआयकरिता एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने हमीभावाने कापूस खरेदी करण्यात आली. शासनाने यावर्षी कपाशीला ५ हजार ८२५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. परिणामी, शेतकरी मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सीसीआय तसेच पणन महासंघालाच मोठ्या प्रमाणात कापूस विकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून होणारी कापूस विक्री तसेच आॅनलाईन पध्दतीने बँक खात्यात कापसाचे चुकारे जमा करताना उडणारा गोंधळ यावर नियंत्रण ठेवणे मोठे आव्हानात्मक आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून कापूस पणन महासंघाने नोंदणी आणि चुकारे जमा करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीत कापूस नोंदणी करता तेलंगणा राज्यात सीसीआयकडून अ‍ॅप वापरले जाते. महाराष्ट्रात या वर्षीच्या हंगामात त्याच कंपनीकडून विकसित अ‍ॅप वापण्याचा निर्णय कापूस पणन महासंघाने घेतला आहे. इंडसंड बँकेकडून त्यांच्या खर्चाने हे अ‍ॅप विकसित करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात पहिल्या टप्प्यातील बोलणी झाली. यंदाच्या हंगामातील कापूस नोंदणीसाठी मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना यांच्यासमोर यासंदर्भात सादरीकरण करण्याचे काम पूर्ण व्हायचे आहे. त्यानंतर या वर्षीच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करता अ‍ॅपचा पर्याय राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्राने दिली.गैरप्रकाराला बसणार चापशेतकºयांना स्वत:च्या अ‍ॅन्ड्राईड मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊ नलोड करावा. त्यावर स्वत:ची माहिती, कापसाचे क्षेत्र, सातबारा आदी माहिती अपलोड करावी, एकरी उत्पादकता लक्षात घेवून त्या शेतकऱ्यांकडून तितकाच कापूस खरेदी केला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर अतिरिक्त कापूस विकायचा प्रयत्न केल्यास शक्य होणार नाही. कापूस क्षेत्र आणि उत्पादक गृहीत धरूनच कापूस विकता येईल आणि एकदाच नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला चाप बसण्याची शक्यता बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :cottonकापूस