लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांती लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण व स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या अर्धांगीनी व दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस तर प्रमुख पाहुणे खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना कार्यक्रमाचे आयोजक आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांती लढा अजरामर आहे. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे येथील स्मृतीस्थळाचा विकास करण्यासाठी विविध कामे पूर्ण करण्यात आली. बरीच कामे सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंब प्रमुखाचा सत्कार, माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन, रक्षाबंधन कार्यक्रम, २ कोटी ८९ लाख खर्चून तयार केलेली पंचायत समिती प्रशासकीय इमारत, १० कोटी ४२ लाखांची मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह इमारत, जांभुळघाट येथील २ कोटी ५० लाखांच्या ३३/ ११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे , जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेणुका दुधे, वसंत वारजूकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले आहे.
शुक्रवारी चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:52 AM
चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देअमृता फडणवीस उपस्थित राहणार : कोट्यवधींच्या विकास कामांचे लोकार्पण