याप्रसंगी मूल येथील माजी सैनिकांचा सत्कार आणि कारगिल शहिदांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर, ज्येष्ठ पत्रकार विजय सिध्दावार, राईस मिल असोसिएशनचे जीवन कोंतमवार, नगरसेवक विनोद कामडे, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा महेशकर, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, माजी जि. प. सदस्य मंगला आत्राम, साई मित्र परिवारचे अध्यक्ष अभिजित चेपूरवार, माजी सैनिक बाबा सूर, फुलचंद मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक अमित राऊत, संचालन सुजाता बरडे, आभार प्रदर्शन वासू वाकडे यांनी केले. विवेक मुत्यलवार, सचिन वाकडे, रूपेश कोठारे, बंडू साखलवार, संदीप मोहबे, नितीन अलगुनवार, पिंटू पिपंळे, रितीक पोगुलवार, रोहित अडगुरवार, महेश भुरसे, प्रवीण गभणे, कला निकेतन संच यांनी सहकार्य केले.
मूल येथे शहीद स्मारक लवकरच : नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:29 AM