कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही व्यक्ती एन-९५ मास्क वापरतात. आता तर बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी मास्क विक्रीसाठी आले आहेत. या मास्कची मेडिकल क्वॉलिटी काय, हा प्रश्न निर्माण झाला. बरेच व्यक्ती निकृष्ट दर्जाचा मास्क वापरत असल्याने त्वचेचे आजार होत आहेत. त्यामुळे मास्क वापरताना गुणवत्तेचाच विचार करणे अत्यावश्यक आहे.
मास्क आवश्यकच; पण...
असे करा त्वचेचे रक्षण..!
मास्क घातल्यावर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्यास, त्यात असलेले हायपरकेनिया डोकेदुखी व चक्कर येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेला खाज सुटते. त्यामुळे गर्दी असताना मास्क लावा; परंतु जेव्हा गर्दी नसेल तर मास्कचा कमी वापर करता येईल.
त्वचा खाजवल्यास संसर्ग
वारंवार खाजवल्यास त्वचेसंबंधित आजार डोके वर काढतात.
त्वचा कोरडी पडून सतत खाज येते. अतिप्रमाणात खाजवल्यामुळे त्वचेला हानी पोहोचून संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांना दाखवावे. मास्क टाळून स्वच्छ रुमालही वापरता येईल.
-डॉ. महेंद्र जोशी, त्वचारोग तज्ज्ञ, चंद्रपूर
सॅनिटायझरपेक्षा साबण बरे
सॅनिटायझरमध्ये सौम्य प्रमाणात अल्कोहोल असते. हे सर्व घटक तपासाअंतीच उत्पादनात वापरले जाणे बंधनकारक आहे. मात्र, सॅनिटायझरच्या नावाखाली अपायकारक घटक टाकून विकण्याच्या घटना उघडकीस आल्या. याचे हातावर अनिष्ट परिणाम होतात. त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा साबण वापरणे केव्हाही उत्तम आहे. कोरोनाकाळात मास्क व सॅनिटायझर वापरताना प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.