चंद्रपूर : चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशहितासाठी झटत असून त्यांची निती सुध्दा देशहितातच असते. नागरिकत्व संशोधन कायदा हा राष्ट्रहितातच असून देशातील कुठल्याही नागरिकांच्या विरोधात हा कायदा नाही. पाकीस्तान, बांग्लादेश, अफगाणीस्तान येथील अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्यांक हिंदु, शिख, ईसाइ, बौध्द यांना साथ देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गांधी चौक चंद्रपूर येथे सीएए समर्थनार्थ राष्ट्रीय चेतना मंचच्या वतीने आयोजित रॅलीत ते बोलत होते.हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा मुस्लीमांविरोधात असल्याबाबत कॉंग्रेस व विरोधी पक्ष संभ्रम पसरवीत असून मुस्लीम समाजाला भडकविण्याचे पाप करीत आहे, देशात अशांती व हिंसा पसरवित असल्याची टिका यावेळी हंसराज अहीर यांनी केली. परंतु त्यांच्या या क्रुर राजकारणामुळे जाळपोळीतून व अन्य हिंसक आंदोलनातून राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी सर्वस्वी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्ष जबाबदार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भारतमातेवर, हिन्दुस्थानवर प्रेम करणाऱ्या कोणताही नागरिकाला या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जे याचा विरोध करीत आहेत त्यांची वृत्ती देशविरोधी आहे. पण अशांना आपण स्पष्ट सांगायचे आहे की, ‘मेरे तिरंगे की ओर गलत नजर से देखोगे, तो ये नजर भी नही बचेगी’ असेही ते म्हणाले. या कायद्यामुळे या देशातील कोणत्याही मुस्लीम धर्मीय बांधवाला कोणताही धोका नाही. देशातील काही राजकीय पक्ष या कायद्याचा बाऊ करत आहेत. अफवा व गैरसमज पसरवून समाजमनात विष कालविण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करीत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक तुषार देवपुजारी, माजी आमदार शोभा फडणवीस, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, अॅड. रवींद्र भागवत, वनिता कानडे, ब्रिजभूषण पाझारे, विजय यंगलवार, राहुल सराफ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. ही रॅली गांधी चौकातून जटपुरा गेट मार्गाने पुन्हा गांधी चौकात येवून विसर्जित झाली.कायदा राष्ट्रहिताचा-मुनगंटीवारया देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूखपासून कच्छपर्यंत १३५ कोटी नागरिक जात, धर्म, रंग, वंश यांच्या बाहेर जावून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे अर्थात सीएएचे समर्थन करीत आहे. मात्र काही राजकारणी स्वार्थापोटी, खुर्चीसाठी या कायद्याला विरोध करत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, अफवा पसरवत आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रहीत महत्वाचे नाही, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. या कायद्यामुळे कोणालाही धोका नाही. धर्माचा आधार घेवून आतंक निर्माण करणाऱ्यांना खरा धोका आहे. या देशावर प्रेम करणाºया कोणत्याही नागरिकाला या कायद्याला घाबरण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या देशावर प्रेम करणाºया नागरिकाला या कायद्यामुळे नुकसान झाल्यास पंतप्रधान पद त्यागण्याची तयारी नरेंद्र मोदींनी दाखविली आहे. त्यामुळे या कायद्याची भीती बाळगण्याची कोणतेही कारण नाही, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भव्य तिरंगा रॅलीचे आकर्षणसदर रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा पकडलेला होता. याशिवाय कित्येक फूल लांब तिरंगा शेकडो नागरिक हात धरून रॅलीत सहभागी झाले होते. हा तिरंगा रॅलीचे आकर्षण ठरला आहे. रॅलीत महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ चंद्रपुरात विशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 6:00 AM
हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर । नागरिकत्व संशोधन कायदा समर्थन म्हणजेच देशप्रेम