मूल : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्तांच नातं’ या अभियानांतर्गत मूल येथे आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
शिबिराचे उद्घाटन मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या हस्ते पार पडले. शिबिराला मूल नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. उज्ज्वलकुमार इंदूरकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम यांनी केले, संचालन प्रा. चंद्रकांत मनियार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भोजराज गोवर्धन यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण प्रतिनिधी शशिकांत गणवीर, सुजित कडस्कर, गंगाधर कुनघाडकर यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, श्रीकांत समर्थ, अभय चेपूरवार, अमेक बारापात्रे, सूरज चिटमलवार, शिवाजी नागरे, तुषार शिंदे, हरिश्चंद्र वाघडे, वैभव बुरांडे, राजेंद्र येरणे, गुलाब चहारे, प्रतिभा मस्कावार, सुभाष तेलमासरे, हर्षल कांबळे, अमोल उराडे, अरविंद झाडे, सुनील गुरुनुले, डाॅ. गिरीधर तागडे, शुभम रगडे, ॲड. अश्विन पालीकर, संदीप धाबेकर, मधुकर कडस्कर, आकाश कळमकर, शशिकांत गणवीर यांनी रक्तदान केले.
बॉक्स
तीन भावांचे एकाचवेळी रक्तदान
या शिबिरात मूल तालुक्यातील मरेगाव येथील विकास तुकाराम वाकुडकर, आकाश तुकाराम वाकुडकर आणि हरीश तुकाराम वाकुडकर या सख्ख्या तीन भावांनी रक्तदान करून रक्तदानाचे महत्त्व किती आहे, हे दाखवून दिले.