लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या ११ वर्षांपासून गावकऱ्यांना पाणी पुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनाने आणल्याने आता उन्हाळा सुरू झाल्यानंतरही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठासारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्विचरूम विषयी गावकऱ्यात चांगलाच वाद चिघळला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. माथरावासीयांना लवकर पाणी मिळावे, यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली.आता आपल्या घरापर्यंत पाणी पुरवठा नळ योजनेचे पाणी पोहचेल म्हणून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागल्याने गावकऱ्यांच्या भल्यासाठी राबविलेली चांगली योजना शासनाच्या बेजबाबदार अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कुचकामी ठरली. उन्हाळ्याचे दिवस असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम राजुरा येथील पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून माथरावासीयांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूचसध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. पाण्यासाठी जिवाची लाहीलाही होत असतानाच माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.माथरा येथे ११ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.- लहुजी चहारे, सरपंच, माथरा.
माथरा पाणी योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM
राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठासारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे.
ठळक मुद्देपाणी मिळणार केव्हा? : पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडले