सुधीर मुनगंटीवार : मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिवार्चित महापौर अंजली घोटेकर व उपमहापौर अनिल फुलझेले यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर,आ. नाना शामकुळे , आ.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, स्थायी समिती सभापती आदींची उपस्थिती होती.यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर अंजली घोटेकर यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, महापौर या नात्याने शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी आपणावर आली आहे. या शहरातील अनेक समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करीत भारतीय जनता पार्टीवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवावे, विकास प्रक्रीयेमध्ये वित्तमंत्री तसेच चंद्रपूर शहराचा पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी महापौर अंजली घोटेकर यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, गटनेता वसंत देशमुख, माया उईके, शिला चौव्हाण, सुभाष कासनगोट्टूवार, शितल गुरनुले, वनिता डुकरे, सोपान वायकर, अंकुश सावसाकडे, राहुल घोटेकर, चंद्रकला सोयाम, जयश्री जुमडे, संदीप आवारी, पुष्पा उराडे, छबु वैरागडे, शितल आञाम, . रवी आसवानी, देवानंद वाढई, सविता कामडे, वंदना तिखे, प्रशांत चौधरी, शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, आशा आबोजवार, . संजय कंचर्लावार, अनुराधा हजारे, सतीश घोनमोडे, खुशबु चौधरी, संगिता खांडेकर, स्वामी कनकम, ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, निलम आकेवार यांची तसेच शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी शहराचा विकास साधण्यास कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही महापौर घोटेकर यांनी दिली.
महापौरांनी स्वीकारला पदभार
By admin | Published: May 08, 2017 12:33 AM